तु राजकरी - मी शेतकरी
-- आदमाने नचिकेत ,
...........आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची माती प्रेरणादायी आहे, अश्या मराठी मुलखातील, मराठी मातीवर राज्य करणाऱ्या शेतकर्यांस माझं विनंम्र वंदन.
आजची परिस्थिती पाहता या प्रेरणादायी मराठी मातीवर राजकीय नावाचं प्रदुषण घिरट्या घालत आहे. आज फक्त नावा पुरता राहिलेला शेतकरी राजा गुलाम तर राज्य करणारे राजकरी झाले आहेत. राजकीय स्थिती आणि शेतकर्यांची परिस्थिती खूपच दुरावली आहे.
परंतु, या मराठी मातीची शिकवण आमच्या मनात रुजलेली आहे. आज फक्त स्थिती वाईट आहे, हा मराठी शेतकरी आधीही राजा होता अन् पुढे ही राजाचं राहणार...... वेळेनुसार काळ नक्की बदलेल, गरज आहे तर फक्त धीर आणि सामर्थ्या ची........
तु राजकरी - मी शेतकरी
तुझी लाखाची साडी, ऊंच माडी
अन् त्यापुढं शानदार आँडी,
माझी तर गवताची काडी, तुटकी माडी
अन् त्यापुढं उभी हातगाडी.
तु तर दुधावरची साय,
तु तर ए-सी हाय फाय
मी तर दूध देणारी गाय,
अन् ऊन्हात हाय हाय.
तु गुंतवणूक शेअर बाजार,
तुला माणूसकीचा आजार
माझ्या नशिबी गाव बाजार,
कधी बरा होईल का हा आजार.
तुझी तर राजकरी सत्ता,
तुला माह सरकारी भत्ता
माझी तर थोडीशीच मालमत्ता,
त्या वरही तुझी सत्ता.
तुझा तो नेहमीचा डाव,
तु खातेस भाव
माझं तर योजनेत नाव,
तरी पोटात काव - काव .
तुला तर पैशाचा वास,
तुला राणी असल्याचा भास.
मला तर जन्मभर त्रास,
अन् शेवटी आत्महत्येचा फास.
पण,
जरी असली तुझी दादागिरी
मी आहे अस्सल शेतकरी.
आज तु कितीही उड्या मारी,
शेवटी येशील ना माझ्या घरी........
-- नचिकेत आदमाने.
( दहिगाव बोलका )
Comments
Post a Comment