मृगजळ Mystery
मृगजळ
कोण इथे कोणासाठी
नाही हेच खरे ,
येतात सारे जातात सारे
उरतात फक्त विसलेले निखारे.
जगणे म्हणजे नाही जीवन
जीवन ही पुस्तकं पाने,
सुखं - दुःखाच्या स्वरांनी
वेढलेले वेडे गाणे .
या गाण्याला साथ असावी
धुंद झालेल्या भावनांची,
संगत मिळते जशी फुलाला
धुंद सुगंधाची.
नशीब म्हणजे एक हास्य
हे केव्हातरी फुलणारे ,
क्षणात सारे संपुन जाते
जसे क्षितिज हातात न येणारे.
माझे मला का वाटते
माझे काही नसताना ,
स्वप्नावरही हक्क नाही
स्वप्न माझे असताना .
मरणाच्या या सरणा वरती
हास्य एकदा बहरावे ,
कधी वाटते कुणासाठी
जीवन हे बरे फुलवावे .
Comments
Post a Comment